चोपडा बसस्थानक आवारातून महिलेचे दागिने लांबविले

चोपडा-लाईव्ह टेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरात कामाच्यानिमित्त आलेल्या शिरपूर येथील वृध्द महिलेच्या पर्समधून ८५ हजार २५० रुपये किंमतीचे सोन्याचे व दागिने अज्ञात महिलेने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार चोपडा बसस्थानकाच्या आवारात घडला आहे. यासंदर्भात चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनंदा सुभाष मोरे (वय-६०) रा. गजानन महाराज कॉलनी, शिरपूर जि. धुळे या वृद्ध महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्या चोपडा शहरात कामाच्या निमित्ताने आलेल्या होत्या. ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्या चोपडा शहरातील बसस्थानक परिसरात उभ्या होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळ एक अनोळखी महिला आली. तिने बोलण्यात गुंतवून सोन्याचे दागिने असा एकूण ८५ हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात महिलेने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. यासंदर्भात वृद्ध महिलेने चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात महिलेवर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनील पाटील करीत आहे.

Protected Content