चोपड्यात कोरोनाचा वाढला संसर्ग; जिल्ह्यात २८७ नवीन बाधीत रूग्ण

जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये चोपड्यात एकाच दिवशी ५० नवीन रूग्ण आढळून आले आहेत. तर आज जिल्ह्यात दिवसभरात २८७ बाधीत आढळून आले आहेत.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात २८७ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. आज सर्वाधीक ६४ रूग्ण हे जळगावात आढळून आले आहेत. याच्या खालोखाल चोपडा तालुक्यात ५० कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत.

उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण-१५; भुसावळ-४; अमळनेर-१९;पाचोरा-४; भडगाव-१३; धरणगाव-११; यावल-१५; एरंडोल-७; जामनेर-१२; रावेर-४; पारोळा-२१; चाळीसगाव-२४; मुक्ताईनगर-१७; बोदवड-६ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील १ असे रूग्ण आढळून आले आहेत.

आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या १८,५८४ इतकी झालेली आहे. यातील १२,७७४ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ३३० रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज ९ मृत्यू झाले असून मृतांचा आकडा ६७१ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ५१३९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

Protected Content