यावल तालुक्यात दोन दिवसात कोरोनाने घेतला चौघांचा बळी

यावल,  प्रतिनिधी । तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला असून मागील दोन दिवसात चार कोरोना बाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर  होम क्वारंटाइन असलेले रुग्ण शहरात उघडपणे फिरतांना दिसत असून प्रशासनाने यावर नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. 

यावल तालुक्यात बाधितांची संख्या वर्षभरात ५ हजारांकडे वाटचाल करीत आहे. तर वर्षभरात दीडशे नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान काल दोन तरुणांचा  कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. तसेच  आज सकाळीच यावल शहरातील एक  ३७ वर्षीय कॉम्प्युटर संचालकाचा  कोरोनाच्या उपचारादरम्यान आणि महेलखेडी गावाच्या एका तरूणाचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

होम क्वारंटाइन नावालाच ; रुग्णांचा शहरात मुक्त संचार

यावल शहरात  मागील आठवडयापासून  कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे.  अनेक रुग्ण हे होम क्वारंटाइनच्या नांवाखाली उपचार घेत असल्याने बाधीतांची खरी आकडेवारी घेण्यास आरोग्य यंत्रणेस अनेक अडचणी येत आहे.  होम क्वारंटाइनच्या नावाखाली  निव्वळ प्रशासनाची व आरोग्य यंत्रणेची फसवणुकी केली जात असल्याने या सर्व दुर्लक्षीत प्रकारेमुळे कोरोना बाधीतांची अप्रत्यक्ष वाढती संख्याही त्यांच्या कुटुंबासाठी व इतरांसाठी अत्यंत धोकादायक होवु पाहात आहे. या सर्व गोंधळलेल्या प्रकारामुळे प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि नगर परिषदच्या कार्यपद्धतीवर  संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या सर्व परिस्थितीवर नियंत्रण न आणल्यास  कोरोना संसर्गाचा विळखा अधिक घट्ट होण्याचे संकेत मिळत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.