जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यातील पहिल्या दि जळगाव को-ऑप. हौसिंग सोसायटीचा अमृत महोत्सवी वर्धापनदिन सोहळा विविध कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला.
तंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्रातील पहिल्या सहकारी हौसिंग सोसायटीची स्थापना जळगावमध्ये दि. ०९/०९/१९४८ ला झाली होती. तत्कालिन सहकारातील प्रस्थ कै. आप्पासाहेब पुंडलिकराव सुर्यवंशी यांनी काही सहकार्यांच्या माध्यमातून सहकारी हौसिंग सोसायटीची कल्पना प्रत्यक्षात आणली. ही राज्यातील पहिली सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणून ओळखली जाते.
अशा या दि जळगाव को-ऑप. हौसिंग सोसायटीचा नुकताच अमृत महोत्सवी वर्धापनदिन सोहळा वृक्षारोपण, आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मान्यवरांच्या हस्ते व सर्व सभासदांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
सर्व प्रथम सकाळी एम. डी. गाडे साहेब (धर्मदाय उपायुक्त) व सौ. स्मिता धारगे मॅडम (सहा. धर्मदाय आयुक्त), व सौ. रंजना ठवरे (सहा. धर्मदाय आयुक्त) व मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून अमृत महोत्सवी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर गोदावरी हॉस्पिटल व नेत्रज्योती हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या आरोग्य व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर सौ. सिमा भोळे यांनी कै. अप्पासाहेब पुंडलिकराव सुर्यवंशी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व अभिवादन करून शिबीराचे उद्घाटन केले.
हौसिंग सोसायटीतील सभासदांच्या कुटुंबातील बहुतेक, सदस्यांनी या शिबीराचा लाभ घेतला. आरोग्य तपासणी शिबीरात १६० तसेच नेत्र तपासणी शिबिरात १९० सभासदांनी तपासणी केली.
याप्रसंगी मान्यवरांसह सोसायटीचे चेअरमन डॉ. दिलीपसिंग पाटील, सेक्रेटरी दिपक सुर्यवंशी, व्हा.चेअरमन रविंद्र पवार, तसेच कार्यकारिणी सदस्य ऍड. विश्वनाथ तायडे, शशिकांत बोरोले, रविंद्र जगताप, अरविंद चव्हाण, प्रमोद पाटील, डॉ. श्रीधर पाटील व नितीन राणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक ऍड. विश्वनाथ तायडे यांनी तसेच सेक्रेटरी दिपक सुर्यवंशी यांनी सोसायटीचा संपूर्ण इतिहास सांगून कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विषद केली. तर आभार प्रदर्शन अरविंद चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डिगंबर संबळे (स्वामी), प्रा. भगतसिंग निकम, डॉ. दिपक राजपूत, डॉ. शिरीष चौधरी, डॉ. चेतन जोशी, डॉ. कु. निधी चावला, डॉ. विनय बुरडकर, डॉ. शुभम अडकिते, डॉ. जान्हवी बनकर व सहकार्यांनी प्रयत्न केले.