गडचिरोली येथे अमित शाहांची सभा

amit shaha

 

मुंबई प्रतिनिधी । भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र निवडणुकीच्या निमित्ताने राज्यभरात प्रचारसभा घेत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभेतील भाजपा उमेदवार राजे अमरिशराव अत्राम यांची प्रचारार्थ आलापल्ली येथे होणाऱ्या सभेसाठी अमित शाह आज हजर राहणार आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

विविध जिल्ह्यात सभा घेतल्यानंतर, अमित शाह यांनी आपला मोर्चा नक्षलग्रस्त भागात वळवला आहे. अहेरी हा नक्षलग्रस्त भागात आज सभा होणार आहे. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाजपने येथे सभेसाठी जय्यत तयारी केली आहे. आलापल्ली इथल्या क्रीडा संकुलात दुपारी 12 वाजता सभेचे नियोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीवेळीही अमित शहा यांची येथे सभा आयोजित करण्यात आली होती. पण हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने, त्यावेळी सभा रद्द करण्यात आली.

Protected Content