Home Cities चाळीसगाव राज्यात रयतेचे राज्य यावे ; माजी आमदार राजीव देशमुख

राज्यात रयतेचे राज्य यावे ; माजी आमदार राजीव देशमुख

0
101

WhatsApp Image 2019 08 07 at 6.50.59 PM

चाळीसगाव, प्रतिनिधी | राज्यात रयतेचे राज्य येण्यासाठी शिवस्वराज्य यात्राचे पक्षातर्फे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेची सुरुवात ६ ऑगस्ट झाली असल्याची माहिती माजी आमदार राजीव देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

शिवस्वराज्य या यात्रेत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, खा.अमोल कोल्हे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ,छगन भुजबळ, धनंजय मुंडे, युवा अध्यक्ष महेबूब शेख व महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर सोबत असतील. राज्यातील विविध जिल्ह्यातील तालुके २८ अगस्ट पर्यंत यात्रा पूर्ण होईल व शिवराज्य यात्राचे सांगता रायगड येथे होईल. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, पाचोरा, व चाळीसगाव येथे यात्रा येईल अशी माहिती देशमुख यांनी दिली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत साळुंखे, महानंदाचे संचालक प्रमोद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा तालुका अध्यक्ष दिनेश पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, सुरेश चौधरी, रवींद्र चौधरी, बंटी ठाकूर, दिपक पाटील, भगवान पाटील, सदाशिव गवळी, प्रदिप राजपूत, भुषण ब्राहमणकर, अमोल चौधरी, श्रीकांत राजपूत, स्वप्नील कोतकर यांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound