Home राष्ट्रीय अमरनाथ यात्रा आजपासून सुरू

अमरनाथ यात्रा आजपासून सुरू

0
45

अनंतनाग-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील अमरनाथच्या पवित्र गुहेत बाबा बर्फानी यांचे दर्शन शनिवारपासून (29 जून) सुरू झाले आहे. बालटाल आणि पहलगाम कॅम्पमधून यात्रेकरूंचा पहिला जत्था पहाटे अमरनाथ गुहेकडे रवाना झाला आहे.

एकूण 4,603 यात्रेकरू आज शिवलिंगाच्या दर्शनासाठी चढणार आहेत. अनंतनागमधील पारंपारिक नुनवान-पहलगाम मार्गे आणि गंदरबलमधील बालटाल मार्गाने २९ जून रोजी सुरू झालेली अमरनाथ यात्रा ५२ दिवस चालणार आहे. 19 ऑगस्ट रोजी संपणार आहे. यावर्षी अमरनाथ यात्रेसाठी 3.50 लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. 26 जूनपासून ऑफलाइन नोंदणी सुरू झाली आहे.


Protected Content

Play sound