अमळनेर प्रतिनिधी | येथे शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानास शिवसैनिकांच्या नोंदणीच्या माध्यमातून प्रारंभ करण्यात आला आहे.
राज्यात १२ ते २४ जुलैच्या दरम्यान शिवसंपर्क मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने येथे पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्याहस्ते या अभियानास प्रारंभ करण्यात आला. यात शिवसैनिकांची नोंदणी करण्यात आली. शिरूड नाका परिसर, पैलाड, ताडेपुरा भागात सभासद नोंदणी करण्यात आली. आपल्या मनोगतातून विष्णू भंगाळे यांनी पक्षाच्या प्रचार प्रसारासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
यावेळी महिला जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, उपजिल्हा प्रमुख मनीषा परब, तालुका प्रमुख विजय पाटील; शहर प्रमुख संजय पाटील, नगरसेविका रत्नमाला महाजन, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, नगरसेवक प्रताप शिंपी, शहर संघटक चंद्रशेखर भावसार, युवा उपजिल्हा प्रमुख श्रीकांत पाटील, शहर प्रमुख अमर पाटील, महिला तालुका प्रमुख संगीता शिंदे, देवेंद्र देशमुख, मोहन भोई, वाहतूक सेनेचे विनोद राऊळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.