Home Cities अमळनेर राहत्या घरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण ; अज्ञातावर गुन्हा दाखल

राहत्या घरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण ; अज्ञातावर गुन्हा दाखल

0
113

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा परिसरातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने फुस लावून अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनीवारी २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा गावातील एका भगात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून तिचे अपहरण केल्याची घटना शनीवारी २८ फेब्रुवारी रोजी घडली आहे. पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या आजोबांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound