आग लावणार्‍या समाजकंटकांना आ. अनिल पाटलांचा इशारा

अमळनेर प्रतिनिधी । शहरातील अंबर्षी टेकडीवर निर्माण झालेली हिरवळ हे आपल्या अमळनेर आपल्या भूमीचे वैभव असून जो कुणी वारंवार आगी लावून हे वैभव नष्ट करीत असेल त्याने भानावर यावे. लोकप्रतिनिधी आणि भूमीचा पुत्र या नात्याने या प्रकाराकडे आम्ही लक्ष वेधले असून यात कुणीही दोषी आढळल्यास त्याची मुळीच गय होणार नाही असा इशारा आज आ. अनिल पाटील यांनी दिला.

वारंवार अंबर्षी टेकडीला आग लावणार्‍या समाज कंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा २६ जानेवारी रोजी उपोषणास बसण्याचा इशारा टेकडी गृप सदस्यांनी निवेदनाद्वारे दिल्यानंतर आमदार पाटील यांनी स्वतः आंबर्शी टेकडीवर भेट देऊन संपूर्ण पाहणी केली. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना आमदर पाटील म्हणाले की टेकडी ग्रुप सदस्य आणि पर्यावरण प्रेमींच्या मेहनतीने आणि प्रशासनच्या मदतीने या टेकडीवर हजारो झाडे लावण्यात येऊन टेकडीच्या सौंदर्यत भर घालण्यात आली आहे. ऐतिहासिक पाठोपाठ निसर्गाचे महत्व लाभलेली टेकडी अमळनेरकरांची अस्मिता आहे.

या टेकडीशी भावनिक नाते आहे मात्र गेल्या काही महिन्यांपासून ११ वेळा टेकडीला आग लावून पर्यावरणाचा र्‍हास केला जात आहे,सुरवातीला अनावधानाने आगी लागत असतील असे वाटत होते मात्र आता वारंवार होणार्‍या प्रकारामुळे हे कुण्या समाजकंटकाचे खडयंत्र असल्याचे दिसत असल्याने संबधित समाज कंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आपण स्वतः करणार आहोत,यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षकांची देखील भेट आपण घेणार असल्याचे आमदारांनी सांगितले.

आमदार अनिल पाटील पुढे म्हणाले की या टेकडीवर यापुढे असे प्रकार घडल्यास प्रशासनाने त्वरित अ‍ॅक्शन घेतली पाहिजे. खरे पाहता या टेकडीची वनविभाग अथवा महसूल विभाग कुणाकडे तरी जवाबदारी निश्‍चित झाल्यास अश्या प्रकारांना अटकाव येणार असून त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. व कुण्या समाजकंटकाविषयी कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी आपल्याला सांगावे संबधित व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन देखील आमदारांनी केले आहे.

यावेळी टेकडी ग्रुप चे डॉ राजेंद्र पिंगळे, नरेश कांबळे, महेश कोठावदे, आशिष चौधरी, डॉ अनिल वाणी, हेमंत पाठक , नंदू भावसार , सुरेश भावसार, नरेश कांबळे, किरण कुंभार, नंदू वाघ, भारत सैंदाणे, संजय चौधरी ,प्रमोद सोनार, डॉ राजेंद्र सोनार, योगेश येवले, आनंद दुसाने, अशोक वाणी , ज्ञानेश्‍वर पाटील , किशोर पाटील , विनोद थोरात आदींची उपस्थित होती.

Protected Content