चाळीसगावला आरटीओचे कार्यालय व्हावे यासाठी आमरण उपोषणास प्रारंभ

चाळीसगाव प्रतिनिधी । येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू व्हावे. यासाठी सन: २००७ सालापासून प्रयत्न केला जात आहे. मात्र त्यात नेहमी अपयशी ठरत असल्याने शेवटी शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख भिमराव खलाणे यांनी प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे.

चाळीसगाव येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात यावे. यासाठी २१ मे २००७ पासून प्रयत्न केला जात आहे. मात्र वेळोवेळी पाठपुरावा करून ही अपयशी ठरत असल्याने शिवसेना विधानसभा तालुका क्षेत्र प्रमुख भिमराव हरी खलाणे यांनी आज सकाळी ११ वाजेपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

जोपर्यंत लेखी स्वरूपात आम्हाला आश्वासित करत नाही. तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे खलाणे यांनी सांगितले. चाळीसगावहून जळगाव हा ११० किलोमीटर असल्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक झळ बरोबरच मानसिक ताण ही सोसावा लागतो. एवढं करून जळगाव आरटीओ कार्यालयात जाऊन एका दिवसात काम होईल याची शाश्‍वती नसते. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा व पारोळा या चार तालुक्यांचा महसूल दर महिन्याला साडे चार ते पाच कोटी दरम्यान आहे. तरीही शासनाचे दुर्लक्ष का? असा प्रश्‍न आता सर्व सामान्य विचारु लागले आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांना होत असलेली गैरसोय ही दुर करून तालुक्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास मंजुरी द्यावी अशी विनंतीपूर्वक मागणी खलाणे यांनी केली आहे.

Protected Content