अमळनेर पंचायत समितीत भाजपला धक्का; सभापतीपदी बंडखोर उमेदवार विजयी

अमळनेर प्रतिनिधी । येथील पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या बंडखोर उमेदवार त्रिवेणीबाई पाटील यांची ईश्‍वरचिठ्ठीच्या माध्यमातून निवड झाली आहे. यामुळे येथे बहुमत असतांनाही भाजपला धक्का बसला आहे.

अमळनेर पंचायत समिती सभापतिपदासाठी समसमान मते झाल्याने त्यात त्रिवणाबाई पाटील यांची ईश्‍वरचिठ्ठीने निवड करण्यात आली. रेखा नाटेश्‍वर पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या सभापतीपदाची निवडणूक गुरुवारी घेण्यात आली.

पीठासन अधिकारी म्हणून तहसीलदार मिलिंद वाघ होते. सहाय्यक म्हणून गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी काम पाहिले. यात भाजपतर्फे कविता पवार यांना उमेदवारी मिळाली. यामुळे भाजपच्याच त्रिवेणाबाई पाटील यांनीही अर्ज दाखल केला. यांना राष्ट्रवादीने पाठींबा दिली. परिणामी दोन्ही उमेदवारांना समसमान म्हणजे प्रत्येकी चार मते मिळाली.

यामुळे ईश्‍वर चिठ्ठीने सभापती म्हणून त्रिवेणाबाई पाटील यांची निवड झाली. त्रिवेणाबाई आता १४ महिन्यांच्या कालावधीसाठी सभापती राहणार आहेत.

Protected Content