यावल येथे सलग दुसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही

यावल प्रतिनिधी । तालुक्यात होवु घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या सलग दुसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेले नसल्याचे महसुल प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.  

दरम्यान यावल तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक पंचवार्षीक  निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर झाले असुन दिनांक २३ जानेवारी २०२०पासुन एकुण ४६९ उमेदवारांच्या निवडणुक करीता नामाकंनअर्ज स्विकारण्याची प्रक्रीया सुरू झाली असुन दुसऱ्या दिवशी देखील एक ही उमेदवाराने आपले अर्ज दाखल केलेले नसल्याचे वृत्त महसुल प्रशासनाकडुन प्राप्त झाले आहे. यावल तालुक्यात होणाऱ्या ४७ ग्रामपंचायतच्या निवडणुकीत एकुण १७७ प्रभाग असुन४६९ उमेदवार निवडुन येणार असुन, यात चोपडा विधानसभा मतदार संघातील एकुण १८ ग्रामपंचायत असुन यात७ १ प्रभाग ८ ६ मतदान केन्द्र असुन१८६ सदस्य निवडुन येणार आहे. 

रावेर विधानसभा मतदारसंघातील एकुण २९ ग्रामपंचायत साठी १०६ प्रभागातुन १३१ मतदान केन्द्रातुन मतदान होणार असुन यातुन २८३ नवनिर्वाचित सदस्य निवडणुन येणार आहेत यावल करीता ५४१४८ पुरूष तर४९८९५ स्त्री असे एकुण १ लाख४० हजार ५३या ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. 

या संपुर्ण निवडणुक प्रक्रीयासाठी एकुण २७ निवडणुक निर्णय अधिकारी यांची निवड झाली असुन त्यांची नावे पुढीलप्रमाणे  :- डांभुर्णी पिळोदेखुर्द साठी पी .ए. कडनोर, किनगाव खु॥साठी एस.टी. जगताप, मारूळ साठी जे .डी.बंगाळे, भालशिव अंजाळे गृप ग्रामपंचायतीसाठी एस. डी . तडवी, बामणोद, सांगवी खुर्द साठी एस.पी. देवरे, निमगाव गृप साठी आर.बी. मिस्त्री, भालोद, राजोरा साठी एम.एफ. तडवी, हिंगोणे, नावरे आर.एस. भंगाळे, दहीगाव, वढोदे प्रगणे यावल आर .पी. इंगळे, डोणगाव, आडगावसाठी के.पी. सपकाळे, मोहराळे, कोसगाव के.टी. देवराज, बोरावल बु, अट्रावल एन .पी. वैराळकर, वनेली, आमोदेसाठी डी.एस. हिवराळे, बोरखेडा बु, सांगवी बु ,साठी एन.एच. तडवी, पिंपरूड, उंटावदसाठी डी .पी.कोते, पिंप्री, विरावली एस .बी. तायडे, बोरावल खुर्द, नायगाव यु.एस. मुंडके, सावखेडा सिम, टाकरखेडा एस .सी. वानखेडे, कोळवद साठी पी .एस. भारंबे , वढोदे प्रसावदा, सातोद ग्रामपंचायती करीता एम .टी. कोल्हे , वड्री खुर्द ए .एन. लहासे, हंबर्डी ग्रामपंचायत साठी पी .एस. विसपुते, मनवेल ए .यु. कदम, कोरपावली पी .आर. कोळी, महेलखेडी साठी एस.बी. सिनारे, कासवे गृप ग्रामपंचायत करीता यु .जे. धांडे, दुसखेडा , डोंगर कठोरा एच.एस. कोल्हे, विरोदे ए.एस. खैरनार , चिंचोली ए .एस. शेकोकार आणी शिरसाड ग्रामपंचायत साठी एम.डी. पाटील यांची तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली आहे.

 

Protected Content