अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील नगरपालिकेच्या मागील बाजूस पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ९ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शांताराम श्रीधर पाटील वय ५७ रा.भवानी नगर, अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते अमळनेर नगरपालिकेत नोकरीला आहे. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ते दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीपी ११९२) ने कामावर आले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी ही नगरपालिकेच्या मागील बाजूस पार्कींगला लावली. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. ही घटना उघडकीला आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर गुरूवारी १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अशोक साळुंखे हे करीत आहे.