अमळनेर अमोल पाटील | डायरी मागण्याच्या बहाण्याने आपल्या पतीच्या खिशातून साडे तीन हजार रूपयांची लुट करणार्या आजीबाईने त्या चोरट्याला काठीने चांगलेच बदडल्याची घटना आज घडली.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील वावडे येथील हिम्मत पाटील आपल्या पत्नीसह बाजारात आले होते. एक इसमाने त्यांच्याजवळ येऊन पेन मागितला परंतु हिम्मत पाटील यांनी पेन नाही सांगतच डायरी द्या म्हणून त्यांच्या खिश्यातून साडे तीन हजार रुपये काढून पळ काढला.
अकस्मात घडलेल्या या घटनेमुळे हिंमत पाटील यांना धक्का बसला. त्यांना चोरट्याचा पाठलाग करता आला नाही. मात्र त्यांनी आरडा-ओरडा केला. त्यांच्या आरोळ्या ऐकून नागरिकांनी चोराचा पाठलाग केला. अखेर काही मिनिटांमध्येच चोरट्याला बसस्थानकाजवलील डी आर कन्या शाळेजवळ पकडण्यात आले. ही माहिती समजताच हिम्मत पाटील यांची वृद्ध पत्नीही तेथे पोहचली आणि नागरिकांसह तिनेही काठीने चोराला चांगलाच चोप दिला. आजीबाईंचा हा संताप बघून परिसरातील लोक चकीत झाले. यामुळे आज शहरासह परिसरात हा चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.