यावल येथे संत गोरोबा कुंभार जयंती उत्साहात

यावल प्रतिनिधी । येथील कुंभार समाज बांधवांच्या माध्यमातुन श्री संत गोरोबा काका कुंभार यांची ७५४ वी जयंती आज यावल शहरातील कुंभार टेकडीवर मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरी करण्यात आली आहे.

श्री संतशिरोमणी गोरोबा काका कुंभार जंयती निर्मित्त यावल येथे (दि.१९) सोमवार रोजी सकाळी ११ वाजता शहरातील कुंभार टेकडीवर श्री संतशिरोमणी गोरोबा काका कुंभार यांच्या प्रतिमेचे पुजन करून आदरांजली अपर्ण करण्यात आली. यावेळी माजी भाजपा वैद्यकीय आघाडीचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक डॉ कुंदन फेगडे, अँड गोविंद बारी व माजी नगरसेवक पुंडलिक बारी या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास नगरसेवक समिर शेख, युवासेना शहर अधिकारी सागर देवांग, जुगल घारू, राष्ट्रवादीचे नरेन्द्र शिंदे, जय स्वाभिमानी कुंभार समाज विकार संस्था जिल्हा युवक अध्यक्ष विजय पंडित, युवा अध्यक्ष राजू कुंभार, संजय कुंभार, सुधाकर कुंभार, सुरेश कुंभार, जगन कुंभार, विलास कुंभार, सुनिल कुंभार, छोटू कुंभार, अनिल कुंभार यांच्यासह समाज बांधव व नागरीक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

 

Protected Content