Home Cities अमळनेर अमळनेर ‘भाजप युवा मोर्चा’ने केलं नाना पटोले यांचं पुतळा दहन

अमळनेर ‘भाजप युवा मोर्चा’ने केलं नाना पटोले यांचं पुतळा दहन

0
106


अमळनेर प्रतिनिधी | ‘भाजपा युवामोर्चा’ पदाधिकारी यांनी माजी आमदार प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचारादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

राष्ट्रीय कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल भंडारा जिल्ह्यातील एका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ” मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो” या वक्तव्यच्या निषेधार्थ अमळनेर भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी यांनी माजी आमदार प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ यांच्या नेतृत्वाखाली नाना पटोले यांच्या पुतळ्याचे आज दहन केले.

भाजपा युवा मोर्चा या संदर्भात अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार देणार असून नाना पटोले यांना अटक झाली नाही तर आंदोलन केलं जाईल असं यावेळी सांगण्यात आलं. याप्रसंगी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत, माजी युवा मोर्चा शहराध्यक्ष योगीराज चव्हाण, सरचिटणीस राहुल चौधरी, उपाध्यक्ष हिरालाल पाटील, दिपक महाजन, गौरव महाजन, गौरव सोनार, सुमीत हिंदुजा, शुभम पाटील, कमलेश वानखेडे, सचिव किरण बोरसे, जगदीश पाटील, प्रसिद्धी प्रमुख सौरभ पाटील, सागर बारी, कपिल पाटील, प्रविण पाटील यासह भाजप युवा मोर्चा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound