नूतन मराठा महाविद्यालयात रंगली बहिणाबाईंच्या गाण्यांची सुरेल मैफिल

जळगाव, प्रतिनिधी | मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ जानेवारी ते २८ जानेवारी दरम्यान नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. यात बहिणाबाई चौधरी यांच्या सुरेल गीतांची काव्य मैफिल रंगली.

 

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत भित्तीपत्रकचे अनावरण, वाचन संस्कृती विषयावर व्याख्यान, निबंध स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा आतापर्यंत घेण्यात आलेल्या आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आर. जी. पाटील यांचे आणि गीत सादरकर्त्या डॉ. सुषमा तायडे यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर मराठी विभागाचे प्रा. रत्नाकर कोळी यांनी डॉ. सुषमा तायडे यांचा थोडक्यात परिचय करून दिला.
अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करत डॉ सुषमा तायडे यांनी, बहिणाबाई चौधरी यांच्या एकाहून एक सरस गीतांची मेजवानी उपस्थितांना दिली. त्यांनी आपल्या गीतातून सासू सुनेपासून ते कुटूंबातील, समाजातील आणि भोवतालच्या सर्व घटकांचा बारकाईने घेतलेला शोध आणि बोधात्मक गितांची सुरेल संगीताने नटलेल्या काव्य मैफीलीची अनूभुती करुन दिली.
एक गाणं किंवा काव्य झाल्यावर त्याचा मतितार्थ सांगून पुन्हा दुसऱ्या गीताला सुरुवात अनं त्याला सुरेल संगीताची साथ असा हा अनोखा आणि आगळावेगळा कार्यक्रम या पंधरवडाचा विशेष ठरला.या सुरेल काव्य मैफलीत हार्मोनियम वादक म्हणून नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ राहूल संदानशिव आणि तबला वादक सागर गुरव यांनी अत्यंत मोलाची साथ दिली..
अध्यक्ष डॉ. आर. जी. पाटील यांनी भाषणात बहिणाबाई चौधरी जरी हयात नसल्या तरी त्यांचे अजरामर काव्य आणि गीत पिढ्यानपिढ्या टिकून, येणाऱ्या असंख्य पिढ्यांचे संवर्धन करत राहील. मैफील चे कौतुक करत त्यांनी अशा कार्यक्रमांत उतृस्फुर्तपणे सहभाग घेत कार्यकमाची रंगत वाढविणारे सहकारी प्राध्यापकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचालन मराठी विभागाच्या प्रा. रिना पवार यांनी केले तर आभार मराठी विभागचे प्रा. राकेश गोरासे यांनी मानले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संयोजिका तथा मराठी विभाग प्रमुख प्रा. ललिता हिंगोणेकर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एन. जे. पाटील, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र देशमुख आणि प्राध्यापक उपस्थित होते.

Protected Content