अमळनेरात कार्यशाळा :कृषी विभागातर्फे ‘पीएमएफएमई’वर मार्गदर्शन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मंगळग्रह सेवा संस्था आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्षेत्रीय किसान गोष्टी व रब्बी हंगामपूर्व कार्यशाळा पार पडली. यात विविध बाबींसह पीएमएफएमईवर मार्गदर्शन करण्यात आले.

जागतिक पर्यावरण संवर्धन दिनाचे औचित्य साधून मंगळग्रह मंदिरात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर, शेतकरी ’पीएमएफएमई’ या योजनेचे जिल्हा कन्सल्टंट सुबोध पाटील, सल्ला समितीचे तालुकाध्यक्ष सुनील पवार, प्रकल्प संचालक (आत्मा) कुर्बान तडवी, ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. स्वाती कदम, स्मार्ट नोडल ऑफिसर श्रीकांत झांबरे, मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार, मयूर कचरे, योजनेचे जिल्हा समन्वयक समाधान पाटील, कृषी पर्यवेक्षक दीपक चौधरी, योगेश वंजारी, आर. एच. पवार, एम. जी. पवार, दिनेश पाटील, निशा सोनवणे, नलिनी पाटील, सुप्रिया पाटील, तालुका तंत्र व्यवस्थापक भूषण पाटील, मंगळग्रह सेवा संस्थेचे ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, प्रशासन अधिकारी भरत पाटील आदी मान्यवर सहभागी झाले.

या कार्यशाळेत आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना उद्योग-व्यवसायासाठी चालना देऊन बळकटी देणे, त्याचप्रमाणे हरभरा व दादर या पिकांच्या नियोजनासंदर्भात या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले. जाधवर यांनी कार्यथाळा आयोजना मागचा हेतू सांगितला. डॉ. स्वाती कदम यांनी हरभरा व दादर या पिकांच्या उत्पादनवाढीसंदर्भात मार्गदर्शन केले. समाधान पाटील यांनी योजनेचा उद्देश, लाभार्थीसाठीची पात्रता, भांडवली गुंतवणुकीचे निकष, आर्थिक मापदंड, सामायिक पायाभूत सुविधा, अर्ज करण्याची पद्धत, बचत गटांचे योगदान, बँकेसंदर्भातील अडचणींवर कशी मात करावी आदीसंदर्भात मार्गदर्शन केले.

कृषी पर्यवेक्षक दीपक चौधरी यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि नागरिकांची उपस्थिती होती.

Protected Content