पोस्ट बेसिक विद्यालयाच्या इमारतीच्या रंग कामासाठी माजी विद्यार्थ्यांचे आर्थिक योगदान

पाचोरा प्रतिनिधी । सातगाव (डोंगरी) ता. पाचोरा येथील पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीला रंग काम करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी भरीव आर्थिक मदत दिल्याने इमारत पुन्हा नावारूपाला आली आहे.

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालयाची स्थापना १९७९ पासून सुरू झाली आहे. या इमारतीतून शेकडो माजी विद्यार्थी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून आपापल्या चांगल्या व्यवसाया निमित्त मुंबई, कल्याण, पुणे, औरंगाबाद, नाशिक तसेच देश रक्षणासाठी सीमेवर अहोरात्र सेवा बजावत आहे. अशा अनेक ठिकाणी चांगल्या पदावर कार्यरत आहेत. गावकऱ्यांनी इमारत उभी करून अनेक वर्ष झाले आहे. तसेच दरवर्षी पावसाच्या पाण्याने इमारत खराब व जीर्ण अवस्थेत दिसत असल्याने दिपावली निमित्त गावात येणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या मनात “माझी शाळा” म्हणून पाहण्याचा भावनिक दृष्टिकोन एक आगळा- वेगळा असतो. तसेच आपलेही समाजाप्रती काही देणे लागते. तसेच या विद्यालयाने आपल्यावर शैक्षणिक व चांगले संस्कार घडविले आहेत. माजी विद्यार्थ्यांच्या भावना या इमारतीशी जोडलेल्या असल्याने  अनेकांनी “माझी शाळा” रंग-रूप देऊन कशी पुन्हा सुंदर दिसेल. याच उदात्त हेतूने माजी विद्यार्थ्यांनी “पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालय” या नावाने व्हाट्सअप ग्रुप तयार करून, आपण सर्वजण आर्थिक मदत करून इमारतीला रंग देऊ आणि पुन्हा नवे रूप देऊन जुने वैभव कसे प्राप्त करता येईल या उदात्त हेतूने सर्वांनी आर्थिक मदत दिली आणि आज पुन्हा जणू काही नव्या जोमाने नव्या ताकदीने विद्यार्थ्यांना आपल्या अंगाखांद्यावर खेळण्यासाठी इमारत पुन्हा सज्ज झालेली आहे.

 

 

Protected Content