अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास 10 वर्षांचा सश्रम कारावास

Landmark Supreme Court Judgment Mary Roy v. The State of Kerala 1

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद येथील अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. समाधान पंढरीनाथ मराठे (वय-27) रा. म्हसावद जि. जळगाव असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी समाधान मराठे याने 30 जानेवारी 2016 रोजी पिडीत नैसर्गिक विधीसाठी महिलांचे सार्वजनिक शौचालयात गेली असता तिचे तोंड दाबुन, तिला बाजूल नेवून तिच्या वडीलांना व भाऊला जिवे ठार मारण्याची धमकी देवून जबरदस्तीने बालिकेवर पाच ते सहा वेळा लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात आरोपीविरोधात भादवि 376 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे तपासाधिकारी तथा पोउनि नाना सुर्यवंशी यांनी न्यायालयात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

सदरील खटल्यात नऊ साक्षिदार तपासण्यात आले. पिडीत बालिकेचा साक्ष महत्वाची ठरली. उपलब्ध दस्तऐवज व सरकार पक्षाचा युक्तीवाद लक्षात घेता न्यायालयाने आरोपीस दोषी ठरविले. आज सत्र न्यायाधिश आर.जे.कटारिया यांनी आरोपी समाधान मराठे याला दोषी ठरवत कलम 5 एल अन्वये 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा तसेच 10 हजार रूपये दंड, दंड न भरल्यास पुन्हा 1 महिन्याची साधी कैद आणि भादवी कलम 506 अन्वये 1 वर्षे कारावासाची शिक्षा आणि एक हजार रूपये दंड, दंड न भरल्यास 1 महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. चारूलता बोरसे तर आरोपीतर्फे ॲड. पी.के. देशमुख यांनी कामकाज पाहिले.

Protected Content