उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदाम, पिस्त्याच्या दरात वाढ

badam

नवी मुंबई प्रतिनिधी । गणेशोत्सव जवळ आल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुक्यामेव्याची आवक वाढू लागली आहे. सद्यस्थितीत प्रतिदिन १०० ते १५० टन आवक होऊ लागली आहे. काजूसह अक्रोडचे दर स्थिर असले तरी बदाम, पिस्त्याचे दर काही प्रमाणात वाढले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पावसाळ्यामुळे दोन महिने बाजार समितीमध्ये सुक्यामेव्याची आवक कमी झाली होती. नागरिकांकडून मागणी कमी झाली होती. गणेशोत्सव जवळ आल्यापासून पुन्हा आवक वाढू लागली आहे. गणपती ते दिवाळी या कालावधीमध्ये मसाला मार्केटमध्ये सुक्यामेव्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. या आठवड्यामध्ये प्रतिदिन १०० ते १५० टन आवक रोज होत आहे. होलसेल मार्केटमध्ये अंजीर १ हजार ते १८०० रुपये किलो दराने विकले जात आहे. काजू ७०० ते ११०० रुपये, खजूर ७० ते १३५, अक्रोड ६०० ते ८०० रुपये किलो दराने विकले जात असून तीनही वस्तूंचे दर स्थिर आहेत.

Protected Content