यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील दारिद्रय रेषेखाली कुटुंबातील विधवा महीलांना राज्य शासनाच्या वतीने कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत धनादेश ना. हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आलेत.
यावल तहसील कार्यालयात ना. हरीभाऊ जावळे व मान्यवरांच्या हस्ते दारिद्रय रेषेखालील ३४ विधवा महीला कुटुंब प्रमुखांना आज २७ जुलै रोजी झालेल्या कार्यक्रमात वितरीत करण्यात आले. प्रत्येकी वीस हजार रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला. यात निर्मला भिमराव तायडे, शोभा प्रकाश चौधरी, पुष्पाबाई नंदकिशोर चौधरी, कल्पना राजु तायडे, सावित्रीबाई भरत महाजन, आहल्याबाई पुजाऱ्या बारेला, राधा गोकुळ पवार, मिराबाई पुंडलीक सोनवणे, मंगलाबाई प्रकाश कुंभार,सरलाबाई पितांबर थोगे, संगीता किशोर भोगे, मयराजबी खलील मन्यार ,सायरा अरमान तडवी, सविता गणेश चौधरी, सुगराबी शेख गफ्फार, शोभा ओमप्रकाश चिराबडे,, गायत्री प्रताप चौधरी, रेखा भटु कुंभार, नंदा युवराज कोळी, मुकुल सुभास चौधरी, आशा राजेन्द्र कोळी, जुबेदा संजय तडवी आदींचा लाभार्थ्यांमध्ये. समावेश आहे. याप्रसंगी तहसीलदार जितेन्द्र कुवर, निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार, कृउबाचे संचालक हिरालाल चौधरी, नारायण चौधरी, कृउबाचे उपसभापती राकेश फेगडे, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष विलास चौधरी, जिल्हा परिषद सदस्या साविता भालेराव, नगरसेवक अतुल पाटील, नगरसेवक अॅड. कुंदन फेगडे, भाजपाचे शहराध्यक्ष हेमराज फेगडे, मा.नगरसेवक उमेश फेगडे, हर्षल पाटील, यांच्यासह अनेक कार्यकर्त व पदाधिकारी याप्रसंगी उपास्थित होते.