काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात पुण्यातील जागांचे वाटप जाहीर

aajit pawar

पुणे प्रतिनिधी । काँग्रेस-राष्ट्रवादी दरम्यान अखेर जागा वाटप जाहीर झाल्या असून पुण्यातील विधानसभेच्या आठपैकी चार जागांवर राष्ट्रवादी लढणार आहे. तर तीन जागांवर काँग्रेस लढणार आहे. एक जागा मित्रपक्षाला सोडण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांनी ही घोषणा केली. पुण्यातील पर्वती, खडकवासला, हडपसर आणि वडगाव शेरी या चार विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी लढणार आहे. शिवाजीनगर, कसबा आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस लढणार आहे. तर मित्रपक्षाला कोथरूडची जागा सोडण्यात आल्याची घोषणा मित्रपक्षाला देण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी दिली आहे. एक जागा मित्र पक्षाला सोडण्यात आल्याचं सांगितल्यानंतर ही जागा मनसे लढणार असल्याची अटकळ बांधण्यात आली आहे.

Protected Content