हवाई दलाच्या बेपत्ता विमानातील सगळे जवान ठार

an 32latest

इटानगर (वृत्तसंस्था) भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता झालेल्या एएन-३२ विमानाचे अवशेष अरुणाचल प्रदेशच्या सियांग जिल्ह्यात आढळले आहेत. बचाव दलाने याची पुष्टी केली असून या विमानात असणारे सगळे १३ जवान ठार झाल्याचे वृत्त आहे. अपघातग्रस्त विमानाचे अवशेष मिळालेल्या ठिकाणी आज सकाळी १५ सदस्यीय बचावपथक दाखल झाले होते.

 

मंगळवारी, भारतीय हवाई दलाच्या एएन-३२ या विमानाचे अवशेष सियांग जिल्ह्यात आढळून आले. अपघाताचे ठिकाण अतिशय उंचावर आणि घनदाट जंगलात आहे. त्यामुळे विमानाचे अवशेष असलेल्या ठिकाणी पोहचणे हे एक आव्हानात्मक काम होते. अपघातात ठार झालेल्या १३ जवानांमध्ये सहा अधिकारी आणि सात एअरमन यांचा समावेश होता. अपघातग्रस्त विमानांच्या ठिकाणी पोहचण्यासाठी १५ सदस्यीय बचाव पथकाला हेलिड्रॉप करण्यात आले होते. यामध्ये हवाई दल, लष्कराचे जवान आणि गिर्यारोहक यांचा समावेश होता.

Protected Content