प्लॉट खरेदी प्रकरणात एकावर फसवणूकीचा गुन्हा

fraud

जळगाव प्रतिनिधी । शहरातील जयराम नगर येथील रहिवासी यांना प्लॉट खरेदीप्रकरणात एकाने फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्याचे रामानंद नगर पोलीसांना दिले आहे. त्यावरून एकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील व्यापारी राजेश शांतीलाल ललवाणी (वय-56), रा.जयराम नगर ओंकारेश्वर मंदिर परिसर यांनी भुसावळातील टॅक्स कन्सल्टंट निशिकांत वामनराव कोलते यांच्याकडून 9 ऑक्टोबर 1998 रोजी मौजे खेडी बुद्रुक शिवारातील सर्वे नंबर 29 /2 मध्ये प्लॉट घेण्यासाठी 18 हजार रूपये बायना देवून सौदा पावती केली होती. मात्र कोलते यांना मुदतीत ललवाणी यांना प्लॉट खरेदी खत न अद्यापपर्यंत किंवा प्लॉट नावावर करून दिले नाही. निशिकांत कोलते यांनी 18 हजार रुपयांचा गैरवापर करून प्लॉट खरेदी करून दिलेला नसल्याने त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने 10 जून रोजी सीआरपीसी 202 प्रमाणे चौकशीचे आदेश देण्यात आले असून राजेश ललवानी यांच्या फिर्यादीवरून निशिकांत कोल्हे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content