मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशभरातील औषध विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्या, ऑनलाईन औषध विक्रीवरील नियंत्रण, कॉर्पोरेट कंपन्यांची मनमानी आणि बनावट औषधांच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर दि. २० मे २०२६ रोजी “ऑल इंडिया केमिस्ट्स बंद” पुकारण्यात आला आहे. या आंदोलनाला मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी स्वयंस्फूर्तीने पाठिंबा दर्शवण्याचे आश्वासन मुक्ताईनगर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनकडून दिले आहे.
तालुक्यातील तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक यांना आंदोलनासंदर्भातील निवेदन देण्यात आले असून, २० मे रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व मेडिकल दुकाने बंद राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, रुग्णांना गैरसोय होऊ नये म्हणून संघटनेने आपत्कालीन औषध सेवा उपलब्ध ठेवण्याची व्यवस्था केली आहे.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सदर बंद शांततामय व लोकशाही मार्गाने करण्यात येणार असून प्रशासनाने सहकार्य करावे, ही त्यांची महत्त्वाची मागणी आहे. यामुळे नागरिकांमध्ये माहिती व जागरूकता निर्माण होईल आणि औषध विक्रेत्यांच्या वैध मागण्यांकडे लक्ष वेधले जाईल.
आपत्कालीन सेवेसाठी जाहीर करण्यात आलेले मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत:
मुक्ताईनगर शहरासाठी: 9422779836, 9422225199, 9422562647, 9730681768, 7066132811, 9970848257
मुक्ताईनगर ग्रामीणसाठी: 7387357065, 9108757979, 7030283134



