यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील नागरिकांना मुबलक व नियमीत पाणीपुरवठा होत नसल्याने शहरातील नागरिक व महिला प्रशासनाच्या धारेवर आले आहेत. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा अभियंता अनुराधा पाटील यांनी नागरिकांना नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याचे आश्वासन दिले.
नगरपालिकेवरील मोर्चाचे नेतृत्व भारतीय जनता पक्षाच्या गटनेत्या सौ नंदा महाजन यांनी केले. या मोर्चात नगरसेविका सौ वर्षा येवले, सौ सविता नन्नवरे, नगरसेवक बाळू फेगडे, नगरसेवक योगेश चौधरी, नगरसेवक रूबाब तडवी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अप) गटाचे कदीर खान आणि अनेक महिला व नागरिक सहभागी झाले.

मोर्चादरम्यान नागरिकांनी नगरपालिकेकडे पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी केली. यावेळी नागरिकांनी शहरातील पाण्याच्या पुरवठ्यावरील तक्रारींचा निष्कर्ष घेऊन मुख्याधिकारी निशिकांत गवई यांना मागणीचे निवेदन दिले.



