खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रोटरी क्लब खामगाव तर्फे १९ फेब्रुवारी रोजी अखील भारतीय हास्य कवि संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
रोटरी मतीमंद विद्यालय, रोटरी स्कूल व इतर समाजपयोगी कार्याच्या सहाय्यार्थ सोमवार दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी स्थानीक जे.व्ही. मेहता नवयुग विद्यालय (न्युईरा हायस्कूल) च्या भव्य प्रांगणात अखिल भारतीय विराट कवि सम्मेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मध्ये विख्यात नामांकित वीर/हास्य रस कवी शशिकांत यादव, गीतकार प्रियांशु गजेन्द्र, श्रृंगार रस कवयित्री सोनल जैन, हास्य व्यंग कवी दिनेश देसी घी आणि हास्य व्यंग कवी हिमांशु बवंडर हे काव्य पाठ करणार आहेत.
सदर कविसंमेलन हे हास्य, वीर आणि श्रृंगार रसाचे अभुतपुर्व संगम ठरणार आहे हे निश्चित. मागील ६ वर्षापासून जे जे कविसंमेलन घेण्यात आले ते सर्व उत्कृष्ट नियोजनामुळे सर्व रसिकांच्या प्रशंसेस पात्र ठरले होते. यंदाचेही संमेलन स्मरणीय ठरावे या करीता सर्व रोटरी सदस्य परीश्रम करीत आहेत.
रोटरी क्लबचे शिस्तबध्द कार्य हा नेहमीच खामगांवकरांचा प्रशंसेचा विषय असतो. रोटरी क्लब खामगाव ही समाजपयोगी कार्यांमध्ये नेहमीच अग्रेसर असते. रोटरी क्लब खामगांवव्दारे रोटरी गतीमंद विद्यालय व रोटरी इंग्लिश स्कुल चालविण्यांत येतात. या दोन्ही शाळांकरीता कुठल्याही प्रकारचा शासकीय निधी प्राप्त होत नाही. यांचा संपुर्ण खर्च रोटरी क्लब व खामगांव शहरातील दानदात्यांकडून होत असतो. यातून झालेले उत्पन्न गतीमंद मुलांचे शिक्षणाकरीता, गतीमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांचे व्होकेशनल प्रशिक्षणाकरीता व गतीमंद विद्यार्थ्यांना त्यांचे पायावर उभे करण्यास मदत करण्याकरीता वापरण्यांत येणार आहे. हा उदात्त दृष्टीकोन समोर ठेवून रोटरी क्लब खामगांव कवी संमेलनाचे आयोजन करीत आहे.
संबंधीत संमेलन हे भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असुन शतकापासुन चालत आलेल्या या परंपरेला समृध्द करण्याकरीता तसेच वर्तमान तथा भावी पीढीला ह्या उत्कृष्ट परंपरेचा परिचय व्हावा या करीता रोटरी क्लब खामगांवच्या प्रयत्नाला सर्वानी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा असे आवाहन रोटरी क्लब अध्यक्ष रोटेरीअन सुरेश पारीक, सचिव रोटेरीअन आनंद शर्मा व प्रकल्पप्रमुख रोटेरीअन विजय मोदी यांनी केलेले आहे. अधिक माहिती आणि प्रवेशपत्रांसाठी रोटेरीअन विजय मोदी (मो नं ८८८८२०८०३०) किंवा रोटेरीअन आशिष पटेल (मो नं ९९२३२५२२२७) यांचेशी संपर्क साधावा.