राज्यातील सर्व परीक्षा आता ऑफलाईनच होणार : उदय सामंत

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत  यांनी विद्यापीठाांच्या परीक्षा यापुढे ऑफलाईनच घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

सध्या कोविडचा प्रकोप बर्‍याच प्रमाणात आटोक्यात आल्यामुळे आता यापुढे सर्व परीक्षा या ऑफलाईन प्रकारातच घेण्यात येणार असल्याची घोषणा उदय सामंत यांनी  केली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना वेळ अपुरी पडू नये, यासाठी काही परीक्षांसाठी वेळ वाढवून देण्यात आली होती. परीक्षेआधी प्रश्नपत्रिकाही देण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र अखेरीस आता सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन होतील, असं उदय सामंत यांनी म्हटलंय.

तसेच बारावीच्या परीक्षेबाबतही उदय सामंत म्हणाले की, शेवटच्या वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि निकाल लवकर लावावेत अशा सूचना विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे बारावीचे विद्यार्थी हे अनेकदा सीईटी परीक्षेच्या स्पर्धेत बारावीच्या मुख्य अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष करतात असंही निदर्शनास आलं आहे. याचा विचार करुन पुढच्या वर्षीपासून मेरटीसाठी बारावी आणि सीईटी असे प्रत्येकी पन्नास टकेक गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.

 

Protected Content