पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ९ ऑगस्ट २०२४ रोजी आर. जी. कार मेडिकल कॉलेज, कोलकाता येथील पोस्ट ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनचे वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा ड्युटीवर असताना क्रूरपणे बलात्कार करून हत्या करण्यात आली, या भीषण घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसला आहे. याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी संप सुरू केला आहे आणि सर्व पॅथी आणि डॉक्टर असोसिएशनने देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चा आयोजित केला आहे.
सदरील गुन्ह्याच्या तपासात कॉलेज प्रशासन आणि पोलिसांचा प्रतिसाद संशयास्पद होता, आणि प्रामाणिकपणे तपास सुरू ठेवण्यास ते अयशस्वी ठरले. आर.जी. कार महाविद्यालय प्रशासन व पोलीस यांच्या संगनमताने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याने दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना या प्रकरणाची जबाबदारी केंद्रीय तपास यंत्रणेला म्हणजेच सीबीआय हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.
१५ ऑगस्ट २०२४ रोजी आर जी कार मेडिकल कॉलेजला मोठ्या जमावाने तोडफोड केली आणि आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर हल्ला केला, यावेळी जमावाने गुन्हा झालेले जागेची ही तोडफोड करून नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, या घटनाक्रम डॉक्टर विशेषता महिलांचा हिंसेच्या वाढत्या धोक्याचा आणि वैद्यकीय सुविधांमध्ये सुरक्षेच्या आवश्यकतेचा संकेत देत आहे, सदरील गुन्ह्यातील समर्थनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचारा विरोधात पारोळा डॉक्टर्स असोसिएशनने १७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी 6 वाजेपासून ते १८ ऑगस्ट २०२४ सकाळी 6वाजेपर्यंत २४ तासाच्या वैद्यकीय सेवा बंदीचे आव्हान कऱण्यात आले आहे.
त्यात अत्यावश्यक व आपातकालीन सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत,नियमित बाह्यरुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या आहेत, सर्वपॅथी व असोसिएशनचे सर्व देशवासीयांना या पीडित महिला डॉक्टरचा कुटुंबीयास न्याय मिळवून देण्यासाठी या संपात समर्थन देण्याची विनंती सर्वानुमते करण्यात आली आहे. डॉक्टर्स व हॉस्पिटल वर होणाऱ्या हल्ल्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती यंत्रणा उभी करून ,कायद्यात बदल करण्याचा आग्रह केंद्र शासनाकडे करण्यात यावा ,अशी मागणी पारोळा तालुका डॉक्टर्स असोसिएशन च्या महिला डॉक्टर्स व पुरुष डॉक्टर्स यांच्या वतीने पारोळा पोलीस निरीक्षक श्री सुनिल पवार साहेब, उपनिरीक्षक श्री राजु जाधव साहेब व पोलीस प्रशासनातील सर्व अधिकारी यांना करण्यात आली. यावेळी पारोळा डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव सह महिला डॉक्टर व पुरुष डॉक्टर्स व सदस्य उपस्थित होते.