Home Cities जळगाव संपूर्ण समाज अनिल पाटील यांच्या पाठीशी- मलीक

संपूर्ण समाज अनिल पाटील यांच्या पाठीशी- मलीक

0
39

जळगाव प्रतिनिधी । नशिराबाद येथील जनता आणि संपूर्ण समाज अनिल भाईदास पाटील यांच्या पाठीशी एकदिलाने उभे राहून त्यांना विजयी करणार असल्याचे प्रतिपादन हाजी गफ्फार मलिक यांनी येथे केले.

तालुक्यातील नशिराबाद येथील ऊकाब एज्युकेशन अण्ड मल्टिपपर्ज सोसायटीतर्फे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर होते. तर प्रमुख उपस्थिती हाजी गफ्फार मलिक यांची होती. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीसाठीचे संभाव्य उमेदवार अनिल भाईदास पाटील यांनीही उपस्थिती दिली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. जळगाव लोकसभेचे भावी खासदार म्हणून त्यांची ओळख करून देत सर्व समाज आणि सर्व नशिराबाद त्यांच्या पाठीशी एकदिलाने उभे राहणार असल्याचही ग्वाही गफ्फार मलीक यांनी दिली.

अनिल भाईदास पाटील यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे जोरदार तयारी सुरू केली असून संपर्कास प्रारंभ केला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघात तगडा मुकाबला होण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound