चंद्रकांत हंडोरे पराभूत, भाजपचे लाड विजयी : फडणवीसांची रणनिती यशस्वी !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अतिशय चुरशीच्या लढतीत भाजपचे प्रसाद लाड यांनी बाजी मारली असून यामुळे भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले असून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे.

भाजपतर्फे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली. शिवसेनेतर्फे सचिन अहिर आणि आमशा पाडवी, कॉंग्रेसतर्फे चंद्रकांत हंडोरे व भाई जगताप यांना तिकिट मिळाले. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथराव खडसे यांना तिकिट मिळाले. आकड्यांचा खेळ पाहता भाजपचे चार, शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन तर कॉंग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येणार असल्याचे स्पष्ट होते. मात्र दहाव्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली. यात भाजप आणि कॉंग्रेसच्या उमेदवारात काटे की टक्कर होणार असल्याचे संकेत मिळाले. मात्र प्रत्यक्षात कॉंग्रेस आणि भाजपच्या उमेदवारात टक्कर झाली.

प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे हे पहिल्याच फेरीत विजयी झाले. तर या चुरशीच्या लढतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रसाद लाड यांनी चंद्रकांत हंडोरे यांना पराभूत केले. तर या लढतीत भाई जगताप हे मात्र निवडून आले. यामुळे कॉंग्रेसचे उमेदवार हंडोरे यांना पराभवाचा धक्का बसला असून जगताप हे मात्र आश्‍चर्यकारक पध्दतीत विजयी झाले आहेत. यामुळे भारतीय जनता पक्षाच्या गोटात प्रचंड उल्हासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: