यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातीत किनगाव डोणगाव रोडवरील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल येथे यावर्षी नवीन प्रवेश घेतलेल्या ज्युनियर के.जी.सिनीयर के.जी. व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी गुरुपौर्णिमेनिमीत्त “अक्षरारंभ व विद्यारंभ”या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलचे प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील होते तर व्यवस्थापक पुनम पाटील व उप प्राचार्य राजश्री अहिरराव या व्यासपीठावर उपस्थीत होत्या. कार्यक्रमाच्या सुरूवातीला शिक्षणाचे दैवत सरस्वती मातेच्या पुजनासह दिपप्रज्वलन करण्यात आले तर जिवनातील शिक्षणाची सुरूवात करणाऱ्या चिमुकल्यांना शैक्षणीक जिवनात अक्षरांचा आरंभ (सुरूवात) म्हणजेच “अक्षरारंभ व विद्यारंभ यांचा संस्कार विधीपुर्वक करण्यात आला. तसेच गुरूपोर्णीमा निमीत्ताने आई वडीलांनसह गुरूवर्य यांचेही चरणस्पर्श करत विद्यार्थी व विद्यार्थीनींनी आशीर्वाद घेत आदर व्यक्त केला. यावेळी पालकांनी यज्ञ हवण पुजा केली व यज्ञात आहुती दिली तसेच आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी संकल्प केला. इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलच्या सभागृहात झालेल्या या कार्येक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक हर्षल मोरे, योगीता बिहारी, दिलीप संगेले, देव्यानी सोळुंके, मिलींद भालेराव, भावना चोपडे, प्रतिभा धनगर, गोपाळ चित्ते, अनिल बारेला, पवनकुमार महाजन, संपत पावरा, दिनकर पाटील, नेहा धांडे, वैशाली धांडे, शाहरूख खान, सुहास भालेराव, प्रतिक एम.तायडे, पुजा डी.शिरोडे, तुषार धांडे, बाळासाहेब पाटील इ.नी परीश्रम घेतले.