हिंगोणा ग्रामपंचायत गैरकारभाराच्या चौकशीला विलंब का ?: ग्रामस्थांचा प्रश्न

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील हिंगोणा येथील रहीवासी छबीर फकीरा तडवी यांनी हिंगोणा ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविषयी चार महीन्यापुर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याकडे तक्रारी अर्ज दिलेला आहे. मात्र, याची कोणत्याही प्रकारे दखल घेऊन चौकशी करण्यात येत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

छबीर फकीरा तडवी यांनी हिंगोणा ग्रामपंचायंतीच्या भोंगळ व भ्रष्ट कारभाराविषयी देखील अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. ग्रांमपंचायतीचे कार्यकाळी मंडळ हे उडवा उडवीचे उत्तरे देतात. याकरीता ग्रामस्थांमध्ये तिव्र संताप व्यक्त होत आहे.
ग्रामस्थ विविध प्रकारच्या समस्यांना तोंड देत आहेत. यात गावात पाणी टंचाई गटार समस्या, गावातील महीलांच्या सार्वजनिक शौचालयामध्ये अंत्यत दृर्गंधीचे व घाणी साम्राज्य निर्माण झाले आहे. याबाबत ग्रामपंचायतचे कारभारी हे निव्वळ बघ्याची भुमिका घेत आहे. तरी हिंगोणा ग्रामपंचायत पुर्णपणे मनमानी कारभार करीत असल्याने ग्रामस्थ छब्बीर फकीरा तडवी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज केला आहे. तरी चार ते पाच महिन्याचा कालावधी उलटुन सुद्धा काहीही दखल गेलेली नाही. या व्यतिरिक्त ही यापूर्वी हिंगोणा ग्रामपंचायतच्या कारभारा विषयी नागरीकांनी अनेक तक्रारी दिलेल्या दिल्या आहेत. जिल्हा परिषद जळगावच्या ग्राम पंचायत विभाग यांच्याकडे पाठवलेल्या अर्जाची वरिष्ठ पातळीवर कधी व केव्हा आणि कशी चौकशी करणार याकडे संपुर्ण हिंगोणा ग्रामस्थसह यावल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीचे लक्ष लागले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पकंज आशिया यांनी तात्काळ या सर्व तक्रारींची चौकशी करून योग्य तो न्याय द्यावा अशी अपेक्षा तथा मागणी ग्रामस्थ व तक्रारकर्ते यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.

Protected Content