नांद्रा येथे अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह प्रारंभ

 पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा येथे अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह (दि. ६ सप्टेंबर) पासून प्रारंभ झाला आहे. 

याप्रसंगी विधीवत पूजा अर्चा व होमहवन करण्याचा सन्मान गावातील महादेव मंदिर संस्थानचे जेष्ठ विश्वस्त  ह. भ. प. उत्तम गोकुळ बाविस्कर यांना मिळाला आहे. दररोज रात्री ८ वाजता संकीर्तन कार्यक्रम संपन्न होणार आहे. या अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाची सांगता दि. १३ सप्टेंबर वार सोमवार रोजी होणार आहे. सकाळी ५ वाजता काकड आरती व ९ वाजता काल्याचे कीर्तन संपन्न होणार आहे. सात दिवसाचा पूजाअर्चा विधी सोहळा कार्यक्रम गुर्रुवर्य दिनकरजी खुरे यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी महादेव मंदिरा संस्थान कमिटी अध्यक्ष सुभाष पाटील, सचिव बापु सूर्यवंशी सह सर्व सभासद, महादेव भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, शिवतेज भजनी मंडळ, ग्रामस्थ व तरुण वर्ग परिश्रम घेत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!