पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नव्याने केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण होताच त्यांनी लागलीच माफी मागितली आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विधानावरून खळबळ उडाली असून यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप देखील केले आहेत. दरम्यान, पुण्यातल्या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ मॉंसाहेब, यांच्याविषयी बोलताना, सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर असा झाला. यावरुन भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी टीका केली होती.
यावरून वाद वाढण्याच्या आधीच अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. भाषणात माझ्याकडून ’क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ ऐवजी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर’ असा उल्लेख झाला. ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांचं कार्य आपल्या सर्वांना माहित आहे. माझ्याकडून बोलण्याच्या ओघात झालेल्या चुकीच्या उल्लेखाबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो, अशा शब्दांत अजित पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.