जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेंदुर्णी येथील मूळ रहिवासी व बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे कार्यरत असलेले यशवंत गरुड यांचे अजिंठा कला वारसा चित्र प्रदर्शन जळगावातील प्रसिद्ध पु. ना. गाडगीळ & सन्स् च्या कला दालनात दि. १ ते १५ ऑक्टोबर २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शंनाचे उद्घाटन कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या शुभहस्ते मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वा आयोजित करण्यात आहे. या वेळी परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष नाट्यकर्मी शंभू पाटील, तज्ञ संचालक ग.स.सोसायटीचे राम पवार व ललित कला केंद्र चोपडा या कलासंस्थेचे सेवानिवृत्त प्राचार्य व कला अभ्यासक राजेंद्र महाजन, पीएनजी व्यवस्थापक संदिप पोतदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या चित्र प्रदर्शनात गौतम बुद्धांच्या सद्विचारांवर आधारित जगप्रसिद्ध अजिंठा भितिचित्रांचा संपन्न कला वारसा चित्रकार यशवंत गरुड यांनी आपल्या सृजन संकल्पनेतून साकारलेला आहे. सर्व नागरिकांनी या चित्र प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.