‘जेट’ ची विमाने आज रात्रीपासून जमिनीवर

Jet Airways Flight 1551651393

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जेट एअरवजेची उड्डाणं आज रात्रीपासून बंद होणार आहेत. बँकांनी ४०० कोटींची आपत्कालीन मदत देण्यास नकार दिल्याने जेट एअरवेजची सेवा बंद केली जाणार आहे. आज रात्री १०.३० वाजता जेट एअरवेजचे अखेरचे विमान मुंबईहून अमृतसरसाठी उड्डाण करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यानंतर जेट एअरवेजचं विमान उड्डाण करणार नाही.

 

कर्जात बुडालेल्या जेट एअरवेजने बँकांकडे ४०० कोटींची मदत मागितली होती. मात्र बँकांनी जेट एअरवेजला मदत नाकारल्यामुळे आज रात्री १२.०० पासून जेट एअरवेजची विमाने उड्डाण करणार नाहीत. जेट एअरवेज आर्थिक संकटात सापडल्याने २० हजार कर्मचाऱ्यांवर आता टांगती तलवार आहे.

गेल्या आर्थिक वर्षात जेट एअरवेजला ४२४४ कोटींचं नुकसान सहन करावे लागले होते. कंपनीने जानेवारीपासून वैमानिकांना, अभियंत्यांना, व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांना वेतन दिलेले नाही. या व्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांना अंशत: वेतन दिले जात होते. मात्र त्यांनाही मार्च महिन्याचा पगार देण्यात आलेला नाही. कधीकाळी देशातील अव्वल विमान कंपनी असलेल्या जेट एअरवेजची पाचपेक्षा कमी विमाने सध्या उड्डाण करत आहेत. त्यांचीही सेवा आज रात्रीपासून बंद होईल. कंपनीने सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणेदेखील रद्द केली आहेत.

Add Comment

Protected Content