मालेगाव, प्रतिनिधी । येथे महाराष्ट्राच्या कृषी विभागाचा देशाचा सर्वोत्कृस्ट बहुमान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल देश पातळीवर प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल महाराष्ट्र फर्टी, पेस्टी, सीड्स डीलर्स संघटना पुणे यांनी कृषी मंत्री ना. दादा भुसे यांचे अभिनंदन करून स्वागत केले.
माफदा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विनोद तराळ पाटील यांचा सत्कार कृषिमंत्री दादा भुसे यांनी केला. माफदाच्या अडीअडचणी,मागण्यांचे सविस्तर निवेदन देऊन काही विषय तोंडी सांगितले. त्यावेळी मंत्री ना. भुसे यांनी सविस्तरपणे प्रत्येक विषयावर चर्चा करून काही मार्ग काढले आणि उर्वरित मागण्यांसाठी लवकरच मुंबई येथे सचिव, आयुक्त आणि प्रमुख कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन मार्ग काढू असे आश्वासन दिले. याप्रसंगी माफदा अध्यक्ष विनोद तराळ पाटील, महासचिव विपीन कासलीवाल, सचिव माफदा राजेंद्र भंडारी, सदस्य राजु पाटील , माफदा, उपाध्यक्ष कैलास मालू, राष्ट्रीय खजिनदार आबासाहेब भोकरे , मालेगाव अध्यक्ष अनिल निकम , बाळासाहेब सिरसाट, बाळासाहेब दशपुते, संदीप कोतकर, सचिन खैरनार, दिपक मालपुरे माफदा संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.