जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केसीई आयएमआरमध्ये संपुर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रियन युवकांमध्ये उद्योग वाढीसाठी काम करणाऱ्या सॅटर्डे क्लब बरोबर आयएमआर सोबत करार करण्यात आला.
या प्रसंगी आयएमआरच्या डायरेक्टर प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी सॅटर्डे क्लबचे ट्रस्टी विजय परांजपे, युवा उद्योजक सेलच्या रुपाली ठाकुर, अभिजीत पाटील, आणि सर्व सॅटर्डे क्लब मान्यवरांचे स्वागत केले. त्यावेळी त्यांनी या सहकार्य करारामागची आयएमआरची भुमिका मांडली.
प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे म्हणाल्यात की, आयएमआरमध्ये येणारी बरेचसे विद्यार्थी हे खान्देशातील बिझनेस फॅमिली मधील असतात, ते मॅनेजर होण्यापेक्षा स्वतःच्या बिझनेस सुरु करणे किंवा वाढवण्यासाठी उत्सुक असतात. तसेच आजच्या स्टार्ट अप युगात बिझीनेसचे महत्त्व सर्वच विद्यार्थ्यांसमोर चांगल्या पध्दतीने यावे यासाठी आम्ही या बिझीनेस ओरीएंटेड संस्थेबरोबर सहकार्य करार करीत आहोत. त्यानंतर बोलतांना सॅटर्डे क्लबचे ट्रस्टी विजय परांजपे यांनी, आपल्याला फक्त “स्पिरीट आॅफ एन्ट्राप्रिनर”, पुढे आणायचे आहे त्यामुळे आपण फर्स्ट जनरेशन बिझनेसमनही घडवावेत त्यासाठी आमचे अनेकांचे अनुभव आम्ही इथे खुलेपणाने सांगू आणि योग्य तिथे मार्गदर्शनही करू असे आश्वासन दिले.
त्यानंतर आयएमआर आणि सॅटर्डे क्लब सहकार्य करारावर आयएमआरच्या वतीने डायरेक्टर प्रा.डॉ. शिल्पा बेंडाळे, कोआॅरडिनेटर डॉ. शमा सराफ, जयश्री महाजन यांनी तसेच सॅटर्डे क्लबच्या वतीने क्लबचे ट्रस्टी विजय परांजपे, युवा उद्योजक सेलच्या प्रमुख अॅड रुपाली ठाकुर, सॅटर्डे क्लब जळगावचे चेअरमन अभिजीत पाटील, आणि कन्व्हेनर डॉ. दिपक पाटील यांनी सह्या केल्यात आणि वर्षभरात घेतल्या जाणाऱ्या अनेक उद्योजकता विषयक विविध प्रकल्पांवर साधकबाधक चर्चा झाली.
या कराराच्या वेळी सॅटर्डे क्लबचे श्रीहर्ष खाडीलकर, अभिजीत वाठ, श्रीधर इनामदार, सचिन दुनाखे, डॉ. भावना चौधरी, अॅड निखील कुलकर्णी, रश्मी गोखले उपस्थित होते. तर आयएमआरचे प्रा अनिलकुमार मार्थी, प्रा. दिपाली पाटिल, प्रा. धनश्री चौधरी, प्रा. मानसी भंगाळे, प्रा.रोहिणी बोडस हे उपस्थीत होते.