नवी दिल्ली-वृत्तसेवा | भारतीय कुस्ती महासंघाच्या आखाड्यात अजून ही डावपेच सुरुच आहे. वादाच्या आखाड्यात आता केंद्राने डाव टाकला आहे. यामध्ये नवनिर्वाचीत अध्यक्ष संजय सिंह चीतपट झाले आहेत. महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनाला काही प्रमाणात न्याय मिळाला तर वावगं ठरु नये. कुस्तीच्या आखाड्यात लैगिंक शोषणाच्या आरोपांनी काहूर माजवले होते. देश पातळीवरच नाही तर परदेशातही क्रीडा क्षेत्राला काळिमा फासल्या गेली होती. यावर केंद्राच्या संथ भूमिकेने क्रीडा पटू नाराज होते. याप्रकरणात ठपका ठेवलेले भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे अगदी जवळचे संजय सिंह हे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आले होते. त्यानंतर महिला कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी संन्यास घेण्याची घोषणा केली. आता केंद्र सरकारने कुस्ती महासंघचं बरखास्त केला आहे.
भारतीय कुस्ती महासंघाने कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा आयोजीत केली आहे. ही टूर्नामेंट 28 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशातील गोंडा येथे होणार आहे. यामुळे भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिक नाराज होती. त्यांनी कुस्ती सोडण्याचा निर्णय जाहीर केला. रात्रीपासून झोप लागली नाही. कनिष्ठ महिला कुस्तीपटू भांबावलेल्या आहेत. त्यांचे सारखे फोन सुरु आहेत. या स्पर्धा गोंडा येथील नंदनी नगरमध्ये होणार असल्याचे या महिला कुस्तीपटूंनी सांगितल्यापासून व्यथित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.