तक्रारीनंतर ‘यावल ते बोरावल’ बससेवा पर्यायी मार्गाने सुरु

9287e9f7 b05b 4e1b 8715 5f72ea5b2586

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील बोरावल खुर्द या गावासाठीची येथील बस आगारातुन सुरु असलेली बस गेल्या सहा दिवसांपासुन पावसामुळे रस्ता नादुरुस्त झाल्याने बंद पडली होती. त्यामुळे शिक्षणासाठी यावल येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत होते. ही बस तात्काळ सुरू करावी, या करीता आज आगार प्रमुखांना बोरावल ग्रामपंचायतच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. त्याची दखल घेवून आज ही बस सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

 

या संदर्भात बोरावल खुर्दच्या सरपंच सौ. पल्लवी प्रशांत सोनवणे यांनी यावल बस आगाराचे व्यवस्थापक एस.व्ही. भालेराव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल ते बोरावल खुर्द या मार्गाचे गेल्या पाच महीन्यांपासुन नुतनीकरणाचे काम सुरु असल्याने रस्ता ठिकठिकाणी खोदल्याने या मार्गावरून वाहतुक पुर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे बोरावल खुर्दच्या विद्यार्थ्यांसाठी बससेवा यावल वाघळुद मार्गे टाकरखेडा बोरावल खुर्द या मार्गावरून सुरु करावी. ही बससेवा सुरु झाल्यास विद्यार्थ्याचे शैक्षणीक नुकसान होणार नाही. या निवेदनावर पोलीस पाटील बोरावल खुर्द किरण मधुकर पाटील, रमेश बळीराम पाटील, कवीता सुरेश भालेराव, ज्ञानेश्वर भालेराव, सुकदेव तुकाराम धनगर, प्रकाश आनंदा धनगर, राजेन्द्र यशवंत महाजन, योगेश गोवर्धन महाजन, समाधान आनंदा महाजन, सौ.रजनी हिम्मत महाजन, सौ. निशा कैलाश मोरे, तेजोसिंग आबा पाटील, आशा रतन महाजन, राजेश लक्ष्मण बारेला आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. श्री. भालेराव यांनी या तक्रारीची दखल घेत आज दुपारपासुन पर्यायी मार्गाने बससेवा सुरु केली आहे.

Protected Content