अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार कोसळला ; सेन्सेक्समध्ये ३०० हून अधिक अंकांनी घसरण

download 1

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आज लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी संपूर्ण बजेट सादर केल्यानंतर शेअर बाजार चांगलाच कोसळला. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सेन्सेक्स ४०,००० अंकांच्या पार गेला होता. मात्र, नंतर सेन्सेक्समध्ये तब्बल ३०० हून अधिक अंकांनी घसरण पहायला मिळाली.

आठवड्याच्या आजच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी शेअर बाजार हिरव्या दिव्याने सुरु झाला. सकाळी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १०६.९९ अंकांनी म्हणजेच ०.२७ टक्क्यांनी उसळी घेत ४०,०१५.०५ अंकांवर जाऊन पोहोचला. तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक निफ्टी ३२.१० अंकांनी अर्थात ०.२७ टक्क्यांनी सुधारत ११,९७८.८५ अंकांवर पोहोचला होता. मात्र, दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये सुमारे ३५३.३५ अंकांनी म्हणजेच ०.८९ टक्क्यांनी घसरण झाली. त्यानंतर आता सेन्सेक्स ३९५५४.७१ अंकांवर पोहोचला आहे. तर निफ्टीमध्येही १२३.२५ अंकांची अर्थात १.०३ टक्क्यांची घसरण झाली आणि तो ११.८२३.५० वर पोहोचला. अनेक आघाड्यांवर अपेक्षाभंग झाल्याने शेअर बाजारात नाराजी पहायला मिळाली.

Protected Content