ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर अखेर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर शहरातील पाणीपुरवठा समस्या यावर्षी मे महिन्यापासून असुरक्षित झाली होती. अनेक ग्रामस्थांचे आंदोलन प्रत्येक वार्डामधून आंदोलन तसेच निवेदन नगरपंचायतला देण्यात आले होते. या माध्यमातून नगरपंचायत सी. ओ. यांनी सांगितले होते की लवकरच मुक्ताईनगरचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. यातच गेल्या दोन दिवसांपासून नगरपंचायतचा पाणीपुरवठा सुरळीत झालेला आहे अशी माहिती मुक्ताईनगर मधील नागरिकांनी व नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी दिली.

श्री भगवान वंजारी यांच्या निरीक्षणाखाली मुक्ताईनगर नगरपंचायत चे सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य असून मुक्ताईनगर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचे समजले आहे. आता नागरिकांची फक्त नगरपंचायत कडे मागणी राहिलेली आहे की गल्ली वार्डातून गटारी साफ करणे व रस्त्यावर डबके साचलेले असतात त्या ठिकाणी रस्त्यांचे सुरक्षित करणे एवढी मागणी आहे. ज्या भागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत झालेला आहे त्या भागातून लाईव्ह ट्रेन न्यूजला मिळालेली ही माहिती आहे त्यानुसार बातमी घेण्यात आलेली आहे. नगरपंचायत नि पाणीपुरवठा सुरळीत केल्या नंतर नागरिकांना समाधान मानत आहे.

Protected Content