भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य शासनाने चाळीसगावला एआरटीओ कार्यालयास मंजुरी देऊन एक दिवस उलटत नाही तोच भडगाव येथे देखील हेच कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा करून चाळीसगाव येथे एआरटीओ कार्यालय मंजूर करून आणले असून याचा जीआर देखील जारी करण्यात आला आहे. या निर्णयाचे भडगाव येथे पडसाद उमटून याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, आमदार किशोरआप्पा पाटील यांनी पाठपुरावा करत भडगाव येथे देखील एआरटीओ कार्यालयास मंजुरी मिळवून आणली आहे. याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आले आहेत. चाळीसगावच्या एआरटीओ कार्यालयास एमएच-५२ हा संकेतांक मिळाला असून भडगाव येथील वाहनांना नोंदणी करतांना एमएच-५४ असा संकेतांक मिळणार आहे.