दहीवदमध्ये ४३ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा रंगला स्नेहमेळावा, जुन्या आठवणींना उजाळा !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दहीवद येथील नवभारत विद्यालयातील १९८०च्या दशकातील माजी विद्यार्थ्यांनी तब्बल ४३ वर्षांनंतर एकत्र येत त्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. नाशिक ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक वासुदेव देसले यांच्या संकल्पनेतून या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक यू.ओ. चौधरी सर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सुषमा पाटील, संस्थेचे चेअरमन जयवंत पाटील, संस्थेचे सचिव सुभाष पाटील, मुख्याध्यापक आसाराम सैदाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात त्यावेळचे सेवानिवृत्त शिक्षक यू.ओ. चौधरी, जे.बी. शेलकर, बी.एन. लोहार, बी.ए. लांबोळे, ए.बी. पाटील, गुलाबराव बोरसे, कार्यालयीन अधीक्षक रामकृष्ण सुतार, आनंदा बापू पाटील यांचा पुष्पहार, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व ड्रेस-साडी देऊन यथोचित सत्कार वासुदेव देसले यांनी केला.

या स्नेहमेळाव्यात जुन्या विद्यार्थिनी सुरेखा पाटील (बडोदा), रत्नप्रभा सोनार (कल्याण), प्रतिभा देशमुख (ठाणे), अनुपमा कांकरिया, राजश्री अढाले यांचाही ‘माहेरची साडी’, शाल, श्रीफळ, पुष्पहार, ताम्रदीप व स्मृतिचिन्ह देऊन सुषमाताई पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

४३ वर्षांनी पुन्हा एकत्र आलेले विद्यार्थी आणि शिक्षक खूप आनंदित होते. काही शिक्षक आता हयात नाहीत, त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस दिवंगत गुरूंना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. नवभारत विद्यालयाचे सचिव श्री. सुभाषराव हिम्मतराव पाटील यांनी संस्थेच्या वतीने शाळेचे माजी विद्यार्थी वासुदेव देसले यांची पोलिस उपाधीक्षक पदावर पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला व सर्व माजी विद्यार्थी ४३ वर्षांनी शाळेत पुन्हा एकत्र आले म्हणून त्यांचे कौतुक व आभार मानले.

सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ४८ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. चौधरी सर व लांबोळे सर यांनी पुन्हा वर्गात जाऊन माजी विद्यार्थ्यांना शिकवले. जे विद्यार्थी आता सेवानिवृत्त झाले आहेत, तेही वर्गात बसून चौधरी सर यांनी ४३ वर्षांपूर्वी शिकवलेले गणित आठवणीत रमले. या स्नेहमेळाव्यात अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते, ज्यात पोलिस उपअधीक्षक वासुदेव देसले, ह.भ.प. कैलास पाटील, प्रा. रवींद्र मोरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, संजीव सोनवणे, मुख्याध्यापक धनंजय सूर्यवंशी, विजय पवार, सेवानिवृत्त जवान कैलास माळी, सेवानिवृत्त पोलिस हवालदार रोहिदास सोनवणे, सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी विजय वाणी, सेवानिवृत्त सचिव रमेश अहिरे, तसेच आदर्श शेतकरी नागरिक राजेंद्र पाटील, राजेंद्र पाटील, राजेंद्र पाटील, कैलास बोरसे, शांताराम माळी, गोकुळ पाटील, शिवाजी पाटील, पंडित राजेंद्र मांडे, विश्वासराव पाटील, अकबर खाटिक यांचा समावेश होता. स्नेहमेळावा यशस्वी होण्यासाठी माजी विद्यार्थी वासुदेव देसले, रवींद्र मोरे, कैलास पाटील, विजय वाणी, राजेंद्र पाटील यांनी विशेष प्रयत्न केले व संस्थेच्या चेअरमन यांनी सहकार्य केले.

Protected Content