यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथे तालुका आरोग्य विभागाच्या माध्यमातुन तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी आदीसाठी एएफपी व फेवर रश संदर्भातील प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावल पंचायत समितीच्या नुतन प्रशासकीय ईमारतीच्या सभागृहात पार पडलेल्या या आरोग्य संदर्भातील प्रशिक्षण शिबिराच्या अध्यक्षस्थानी नाशिक विभागाचे डब्ल्युएचओ विभागाचे डॉ प्रकाश नांदापुरकर हे होते.
या प्रशिक्षण शिबीरात यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गफुर तडवी, जिल्हा लसीकरण कार्यक्रमाचे सहाय्यक व्यवस्थापक दिलावरसिंग वळवी, हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज तडवी , सावखेडा सिम आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ गौरव भोईटे, भालोद प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी प्राजक्ता चव्हाण, साकळी प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी स्वाती कवडीवाले , किनगाव प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी मनिषा महाजन, पाडळसा आरोग्य केन्द्राचे यांच्यासह मोठ्या संख्येत उपस्थित सर्व आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी , आरोग्य सेवक / आरोग्य सेविका यांचे डॉ. प्रकाश नांदापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरीकांच्या आरोग्याशी निगडीत ब्लॉक, एएफपी, एफआर, व्हीपीडी व विविध विषयी मार्गदर्शनपर माहीतीचे व प्रशिक्षण देण्याचे शिबीर संपन्न झाले.
या पावसाळ्यापुर्वीच्या संपन्न झालेल्या आरोग्य प्रशिक्षण शिबीरास यशस्वी करण्यासाठी यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गफुर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी महत्वाचे परिश्रम घेतले.