अ‍ॅड. अजय तल्हार यांची असिस्टंट सॉलिसिटर जनरलपदी नियुक्ती

जळगाव । येथील मूळचे रहिवासी असणारे अ‍ॅड.अजय तल्हार यांची राष्ट्रपतींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या असिस्टंट सॉलिसिटर जनरलपदी तीन वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती केली आहे.

माजी प्राचार्य ग.म. तल्हार यांचे सुपुत्र अजय तल्हार यांचे महाविद्यालयीन शिक्षण मु.जे. महाविद्यालय येथे झाले. यानंतर इंडियन लॉ सोसायटी, पुणे येथे १९९६ साली त्यांनी पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वकिली सुरू केली. आता त्यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या असिस्टंट सॉलिसिटर जनरलपदी तीन वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती केली आहे. शुक्रवारी त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार सांभाळला. अतिशय कुशाग्र विधीज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे. शेतकर्‍यांना किमान हमीभाव मिळावा या संदर्भात त्यांनी औरंगाबाद येथे मोठी चळवळ उभारली होती. त्यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील एका मान्यवर व्यक्तीमत्वाचा यथोचित गौरव झाला आहे.

Protected Content