दोन मोबाईल चोर एलसीबीच्या जाळ्यात

भुसावळ प्रतिनिधी । शहरातून मोबाईल चोरी करणार्‍या दोन आरोपींना एलसीबीच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून हँडसेट जप्त केले आहेत.

याबाबत वृत्त असे की, शहरातील मुस्लिम कॉलनी भागातील रहिवासी इम्रान शेख इकबाल ( वय २२ ) आणि सैय्यद आफताब सैय्यद अरमान (वय १९) या दोघांनी मिळून मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने पळवून नेऊन फरार झाले होते. या आरोपींनी वरणगाव नाका व नहाटा चौफुली जवळून चोरी केलेले मोबाईल व रोख रकजम २,५०० रुपये सह, मोटरसायकल (एम.एच.१९ डी.डी.४७२९) आदी बाबी जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली,पोहेकॉ शरीफ काझी,पोना युनूस शेख,पोना किशोर राठोड,पोकॉ रंणजीत जाधव यांनी केली आहे. आरोपींना बाजारपेठ पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

Protected Content